कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
Savitribai Phule
महाराष्ट्र शासन
ग्रामपंचायत सरमळे
अधिकृत संकेतस्थळ
Mohandas Karamchand Gandhi
Dr. Babasaheb Ambedkar
Swami Vivekananda

गणेश मंदिर

ganeshtemple

गावापासून धरणाकडे जाताना मुख्य रस्त्यालगतच नवसाच्या गणपतीचे मंदिर  असून ते गावातील शेतकरी रामचंद्र हरी पाटील(बुवा) यांच्या शेतात आहे. सुरुवातीस शेताच्या बांधावर असणारी ही मूर्ती रामचंद्र पाटील यांच्या नजरेस पडताच त्यांनी छोटे छप्पर उभे करून त्यामध्ये मूर्तीची स्थापना करून पूजा करू लागले. चांदोली धरणाचे काम सुरू असताना वारणावतीमध्ये राहणारे गणेश भक्त दर्शनास येऊ लागले. त्यानंतर त्याच ठिकाणी सर्व भक्तांचे श्रद्धास्थान असणारे गणपतीचे सुंदर मंदिर उभारले आहे. संकष्ट चतुर्थीला खूप दूरवरून आपल्या लाडक्या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त येतात. अंगारकी संकष्टीला या मंदिर परिसराला यात्रेचे रूप येते.या मंदिरा शेजारीच तळे असून या तळ्या जवळ विजया दशमीला सीमोल्लंघन केले जाते.